पक्षी जे झाडावर गाणे गातो
आहे झाडच दुसरे पुन्हा त्या गाण्यात
पक्षी जे झाडावर गातो.
झाडावर जे गाणे पक्षी गातो
आहे पक्षी दुसरा गाण्यातच त्या पुन्हा
झाडावर जे पक्षी गातो.
प्रत्येक काव्यरसिकाच्या मनात त्याचे असे एक कवितेचे स्वतंत्र गाव वसलेले असते. माझ्याही मनात तसे एक गाव आहेच. माझ्या या गावातून फेरफटका मारणे आपल्याला आवडावे, आवडेल...आवडेल?
मंगळवार, ३१ जानेवारी, २०१२
सोमवार, ३० जानेवारी, २०१२
आणीबाणी / अनिल
अशा काही रात्री गेल्यां ज्यांत काळवंडलो असतो
अशा काही वेळा आल्या, होतो तसे उरलो नसतो
वादळ असे भरून आले, तारू भडकणार होते
पाटा अशा घेरत होत्या, काही सावरणार नव्हते!
ह्रपून जावे भलतीकडेच, इतके नव्हते उरले भान,
करपून गेलो असतो इतके पेटून आले होते रान!
असे पडत होते डाव, सारा खेळ उधळून द्यावा;
विरस असे झाले होते, जीव पुरा विटून जावा!
कसे निभावून गेलो, कळत नाही, कळले नव्हते
तसे काही जवळ नव्हते-नुसते हातीं हात होते!
रविवार, २९ जानेवारी, २०१२
श्रद्धा आणि बुद्धी/ शांता शेळके
श्रद्धा जी जी पूजास्थाने मजलागी दाविते
बुद्धी त्यातिल दोष नेमके शोधुनिया काढिते!
श्रद्धा आहे परमेशाचा घ्यावयास आसरा
बुद्धी शंकित होऊनि बोले, ‘आहे का तो खरा?’
प्रीतीमध्ये विलीन व्हाया श्रद्धा हो आतुर
त्या प्रेमातिल व्यंगे लाविति बुद्धीला हुरहूर
श्रद्धा निर्भयपणे धावते ध्येयामागे यदा
बुद्धि तेधवा बसे न्याहळित अंतिम त्या आपदा
बुद्धी अपुले पायबंद नच शकेल घालू जिला
भोळी, सुंदर, निर्भय, श्रद्धा मिळेल का ती मला?
बुद्धी त्यातिल दोष नेमके शोधुनिया काढिते!
श्रद्धा आहे परमेशाचा घ्यावयास आसरा
बुद्धी शंकित होऊनि बोले, ‘आहे का तो खरा?’
प्रीतीमध्ये विलीन व्हाया श्रद्धा हो आतुर
त्या प्रेमातिल व्यंगे लाविति बुद्धीला हुरहूर
श्रद्धा निर्भयपणे धावते ध्येयामागे यदा
बुद्धि तेधवा बसे न्याहळित अंतिम त्या आपदा
बुद्धी अपुले पायबंद नच शकेल घालू जिला
भोळी, सुंदर, निर्भय, श्रद्धा मिळेल का ती मला?
शनिवार, २८ जानेवारी, २०१२
युद्धानंतर / ग. दि. माडगूळकर
युद्धानंतर काय जगावर
राज्य नांदणे शांतीचे?
युद्धानंतर चढतिल गगनी
काय मनोरे नीतीचे?
युद्धानंतर नंदनवन का
होइल अवघ्या विश्वाचे?
-छे छे : नाही! युद्धोत्तर मग-
प्रयत्न दुसर~या युद्धाचे!!
राज्य नांदणे शांतीचे?
युद्धानंतर चढतिल गगनी
काय मनोरे नीतीचे?
युद्धानंतर नंदनवन का
होइल अवघ्या विश्वाचे?
-छे छे : नाही! युद्धोत्तर मग-
प्रयत्न दुसर~या युद्धाचे!!
शुक्रवार, २७ जानेवारी, २०१२
जांगड / भुजंग मेश्राम
त्यांच्या धर्मपीठात गेल्यावर
एक म्हणाला,
‘हामी यादव कुळातले’
दुसरा बोलला,
‘हामी सेटल झालेले भटके’
तिसरा रडला,
‘ढालिया हाव म्हणून काय झाले?’
चौथा हसला,
‘हामी अंधारातले लंबाडे’
हे शांतपणे ऎकल्यावर
‘तरी पण तुम्ही जांगड कसे रे?’
ते सर्व बघू लागले एकमेकांकडे
तर दिसलेत निव्वळ हडप्पाचे सांगाडे
उत्तराच्या शोधात ते शिरले म्यूझियममध्ये
म्हणतात, तिथून ते परत नाही आले-
एक म्हणाला,
‘हामी यादव कुळातले’
दुसरा बोलला,
‘हामी सेटल झालेले भटके’
तिसरा रडला,
‘ढालिया हाव म्हणून काय झाले?’
चौथा हसला,
‘हामी अंधारातले लंबाडे’
हे शांतपणे ऎकल्यावर
‘तरी पण तुम्ही जांगड कसे रे?’
ते सर्व बघू लागले एकमेकांकडे
तर दिसलेत निव्वळ हडप्पाचे सांगाडे
उत्तराच्या शोधात ते शिरले म्यूझियममध्ये
म्हणतात, तिथून ते परत नाही आले-
गुरुवार, २६ जानेवारी, २०१२
माणूस नामका धरम / प्रकाश जाधव
रात धुंडया दीस धुंडया
पन कोण आयताच गवश्या नय
पीर धुंडया दरगा धुंडया
पर होनी को किसने टाल्या नय
जुम्मेसे बैठया मह्यनेसे बैठया
पर हज का पानी आव्या नय
खुद को धुंडया माळरान धुंडया
कोन पाक नजर गवश्या नय
दिस भाय धुंडया रात बेगम धुंडया
पर माणूस नामका धरम गवश्या नय
पन कोण आयताच गवश्या नय
पीर धुंडया दरगा धुंडया
पर होनी को किसने टाल्या नय
जुम्मेसे बैठया मह्यनेसे बैठया
पर हज का पानी आव्या नय
खुद को धुंडया माळरान धुंडया
कोन पाक नजर गवश्या नय
दिस भाय धुंडया रात बेगम धुंडया
पर माणूस नामका धरम गवश्या नय
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)