शुक्रवार, २७ जानेवारी, २०१२

जांगड / भुजंग मेश्राम

त्यांच्या धर्मपीठात गेल्यावर
एक म्हणाला,
‘हामी यादव कुळातले’
दुसरा बोलला,
‘हामी सेटल झालेले भटके’
तिसरा रडला,
‘ढालिया हाव म्हणून काय झाले?’
चौथा हसला,
‘हामी अंधारातले लंबाडे’
हे शांतपणे ऎकल्यावर
‘तरी पण तुम्ही जांगड कसे रे?’
ते सर्व बघू लागले एकमेकांकडे
तर दिसलेत निव्वळ हडप्पाचे सांगाडे

उत्तराच्या शोधात ते शिरले म्यूझियममध्ये
म्हणतात, तिथून ते परत नाही आले-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा