श्रद्धा जी जी पूजास्थाने मजलागी दाविते
बुद्धी त्यातिल दोष नेमके शोधुनिया काढिते!
श्रद्धा आहे परमेशाचा घ्यावयास आसरा
बुद्धी शंकित होऊनि बोले, ‘आहे का तो खरा?’
प्रीतीमध्ये विलीन व्हाया श्रद्धा हो आतुर
त्या प्रेमातिल व्यंगे लाविति बुद्धीला हुरहूर
श्रद्धा निर्भयपणे धावते ध्येयामागे यदा
बुद्धि तेधवा बसे न्याहळित अंतिम त्या आपदा
बुद्धी अपुले पायबंद नच शकेल घालू जिला
भोळी, सुंदर, निर्भय, श्रद्धा मिळेल का ती मला?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा