प्रत्येक काव्यरसिकाच्या मनात त्याचे असे एक कवितेचे स्वतंत्र गाव वसलेले असते. माझ्याही मनात तसे एक गाव आहेच. माझ्या या गावातून फेरफटका मारणे आपल्याला आवडावे, आवडेल...आवडेल?
शनिवार, २८ जानेवारी, २०१२
युद्धानंतर / ग. दि. माडगूळकर
युद्धानंतर काय जगावर राज्य नांदणे शांतीचे? युद्धानंतर चढतिल गगनी काय मनोरे नीतीचे? युद्धानंतर नंदनवन का होइल अवघ्या विश्वाचे? -छे छे : नाही! युद्धोत्तर मग- प्रयत्न दुसर~या युद्धाचे!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा